सोलापूर: प्रेमाची भुरळ पाडून जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. महेश मच्छिद्र चाफाकारंडे (वय २१, रा. सोलापूर) असे शिक्षा या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायालयात बुधवारी या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील आरोपी हा घटनेपर्वी पिडितेच्या घरासमोरून ये-जा करीत होता. यातून ओळख वाढली. त्याने पीडितेला मोबाईल भेट दिल्ळाने बोलणे होत गेले. आरोपीने पिडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर बदनामी करण्याची भीती दाखवून त्याने तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. असे फिर्यादीत नमूद केले होते.
वडील व्यसनाधीन तर आई हयात नसल्याने पिडिता नातेवाईकांसोबत राहत होती. तर घटनेवळी ती अल्पवयीन होती. त्यादरम्यान पिडितेने आरोपीकडे वारंवार लग्नाबाबत विचारणा केली. परंतु दुसऱ्या जातीची असल्याचे सांगून आरोपीने लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपीविरूध्द पिडितेने पोलिसात तक्रार दिली. तालुका पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फ औड. प्रकाश जन्नू यांनी तर आरोपीतर्फे ॲड. सुरेश पाटील यांनी काम पाहिले. सात साक्षीदार तपासलेपिडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही लग्नाच्या आमिषाने आरोपीने अत्याचार केल्याचे साक्षीपुराव्याव्दारे सरकारतर्फ न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या खटल्यात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावली.