ही खुनाची घटना २८ ऑक्टोबर २०१८ रोजी उपळाई रोडवरील एक बँकेसमोर घडली होती. याबाबत मृताचा भाऊ आकाश चव्हाण यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आतापर्यंत सहाजणांना अटक झाली होती. यातील फरार आरोपीचा तपास करताना अटक केलेला सातवा आरोपी अमोल वायकुळे हा डोंबलवडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे, हवालदार रेवनाथ भोंग, पोलीस नाईक श्रीमंत खराडे यांनी जाऊन अटक केली. त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांनी दि. १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
यातील मृत हा घटनेच्या दिवशी घराकडे येताना समोरच्या दुचाकीस कट लागल्याने शिवीगाळ झाली. त्यात चव्हाण यांनी समोरच्यास चापट मारली होती. तो राग मनात धरून चव्हाण याच्यावर तलवारीने व कोयत्याने जबर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता.