उचल पाणी योजनेतंर्गत सांगोला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अचकदाणी गावातील शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने युवा नेते विजय पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. शेतीच्या पाण्यासाठी कोणत्याही सिंचन योजनेत समावेश नसलेल्या १४ गावांचा उजनी दोन टीएमसी उचल पाणी योजनेत समावेश केल्यामुळे या भागाचा कायमस्वरूपी दुष्काळ मिटवून शेतकऱ्यांना सुकाळाचे दिवस आणणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी उपसरपंच शिवाजी चव्हाण, ग्रा. पं. सदस्य गोरख गंभीरे, पोलीस पाटील हनुमंत जाधव, अमोल मोरे, भैया चव्हाण, सत्यवान चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, संभाजी पाटील, लक्ष्मण मोरे, गौतम सावंत, नंदकुमार गंभीरे, रामचंद्र चव्हाण, विजय गंभीरे, विशाल मोरे, हसन मुलाणी, दत्तात्रय मोरे आदी उपस्थित होते.
मृत कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन
आमदार शहाजीबापू पाटील यांनी महूद जिल्हा परिषद गटातील अचकदाणी, ठोंबरेवाडी येथील ठोंबरे कुटुंबीय, विजय कदम, रवींद्र मोरे, अख्तर मुलाणी, विजय गंभीरे, संजय तारे, रामचंद्र कुलकर्णी, उत्तम काटे, दामोदर काळेबाग, नंदकुमार गंभीरे यांच्या घरी भेटी देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
फोटो ओळ :::::::::::::
अचकदाणी ग्रामस्थांच्यावतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित ग्रामस्थ शेतकरी.