सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपुरात दाखल होत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आजारी पडल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरही होम व्कारंटाइन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील यात्रा नियोजनाची जबाबदारी पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. डॉ. भोसले पंढरपुरात दाखल झाले असून त्यांनी सर्व सुत्रे हाती घेतली आहेत.
पाच महिन्यांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे जिल्हाचा कारभार होता. डॉ. भोसले यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी मिलिंद शंभरकर यांची निुयक्ती करण्यात आली. चार महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा याच कामात गुंतून पडली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पंढरपुरात दाखल होत आहेत. या काळातच महापालिका आयुक्त आजारी पडल्याने जिल्हाधिकाºयांना घरात बसून काम करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. या काळात पंढरपूरसाठी एका अनुभवी अधिकाºयाची गरज होती. डॉ. राजेंद्र भोसले यांना पंढरपुरात पाठविण्यात आले आहे.