करमाळा : युवा सेना करमाळा तालुका समन्वयकपदी शंभुराजे फरतडे यांची निवड करण्यात आली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी करमाळा तालुक्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या.
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी या निवडीचे पत्र काढले आहे. या निवडीमध्ये युवा सेना तालुका समन्वयक म्हणून शंभुराजे फरतडे यांची तर शहर समन्वयकपदी तुषार नवले व शहर चिटणीसपदी करण काळे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
या निवडीबद्दल युवा सेना राज्य सरचिटणीस अमोल कीर्तीकर, विस्तारक रुपेश कदम, विपुल पिंगळे, उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत आवताडे, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, करमाळा शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी काैतुक केले आहे.
---
२१ शंभुराजे फरतडे