आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : राज्य महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे शंतनू गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा २७ जानेवारीला जळगाव येथे झाला. या सभेत शंतनू गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात शंतनू गायकवाड यांचा विविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कर्मचारी महासंघाचे प्रदेश सचिव अशोक इंदापुरे यांनी गायकवाड यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश सचिव विवेक लिंगराज, महसूल पुणे विभागाचे सचिव प्रवीण शिरसीकर, उमेश कदम, प्रशांत भांडेकर, रऊफ बिराजदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव सटवाजी होटकर, संघटक बबन जोगदंड, उपाध्यक्ष राहुल सुतकर, शंकर कोळेकर, पाटबंधारे विभागाचे चंद्रकांत चलवादी, एससीबीचे नागराज सोनवणे, उच्च शिक्षण संचालक विभागाचे राजाभाऊ सोनकांबळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे सुहास तळभंडारे, बांधकाम विभागाचे अध्यक्ष देविदास शिंदे, गफूर मुधोळकर, उमाकांत कोठारे, आनंद सोनकांबळे, संजय काळे, अंबादास जाधव, नॉर्थकोट प्रशालेचे सलीम बोरोटीकर आदी उपस्थित होते
महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी शंतनू गायकवाड, महासंघाने दिली सोलापूरच्या नेत्याला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 11:05 AM
राज्य महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे शंतनू गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसंघटनेचा राज्यस्तरीय मेळावा २७ जानेवारीला जळगाव येथे झाला. या सभेत शंतनू गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली कर्मचारी महासंघाचे प्रदेश सचिव अशोक इंदापुरे यांनी गायकवाड यांच्या आजवरच्या कामाचे कौतुकविविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने शंतनू गायकवाड यांचा सत्कार