शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बंदलगी बंधारा गेला वाहून; शेतकºयांची ७ कोटींची झाली हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:53 PM

सीना नदीवरील बंधाºयाचे बांधकाम रखडले; यंदाही पाणीसाठ्याबाबत साशंकताच

सोलापूर : सीना नदीवरील बंदलगी बंधाºयाची दुरुस्ती रखडल्याने सत्ताधारी भाजपची नेतेमंडळी हवालदिल झाली असून, विरोधक हाच विषय आगामी काळात लावून धरण्याच्या तयारीत आहेत. तीन वर्षे उलटून गेली तरी बंधाºयाची दुरुस्ती न झाल्याने या काळात शेतकºयांचे तब्बल ७ कोटींचे नुकसान झाले आहे.

सन २०१६ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात बंदलगी बंधाºयाचे मोठे नुकसान झाले. तळापासून बंधाºयाचे स्तंभ उखडून वाहून गेले होते. त्याच्या पाहणीसाठी भाजपच्या तत्कालीन खासदारांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दौरे करून सत्ताधाºयांना चांगलेच जेरीला आणले.  

तातडीने दुरुस्तीसाठी शेतकºयांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता याच मुद्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न झाला. वर्षभरात बंधाºयाची दुरुस्ती होण्याची अपेक्षा शेतकºयांना होती; मात्र तीन वर्षे उलटून गेली तरीही या बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे या पावसाळ्यात तरी पाणीसाठा होईल याबाबत शेतकरी साशंक आहेत.आगामी काळात येणाºया विधानसभा निवडणुकीत या बंधाºयाची दुरुस्ती हाच विरोधकांचा प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. शेतकरीही या बंधाºयाची दुरुस्ती रखडल्याने अस्वस्थ आहेत.

गेल्या तीन वर्षांत याबाबत जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकाºयांचे दरवाजे ठोठावलेल्या शेतकºयांना राजकीय पाठबळ मिळाले नाही; मात्र आता हा मुद्दा सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याची चर्चा आहे. याबाबत काँग्रेस पक्षातील दुसरी फळी सक्रिय होत आहे. 

स्थानिक शेतकºयांमध्ये धुमसत असलेला असंतोष बाहेर काढण्याचा प्रयत्नही दुसरी फळी करण्याच्या तयारीत आहे.

७६० हेक्टर क्षेत्र सिंचनाविना- बंदलगी बंधारा वाहून गेल्याने या बंधाºयावर अवलंबून असलेल्या शेतकºयाांची मोठी हानी झाली आहे.  बंधाºयामुळे ७६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सप्टेंबर २०१६ मध्ये आलेल्या पुराने बंधाºयाच्या मध्यभागातील स्तंभ वाहून गेले. त्यामुळे पाणीसाठा होत नाही. हेक्टरी सरासरी २० हजार प्रमाणे गेल्या तीन वर्षांत शेतकºयांचे सात कोटी शेतीचे उत्पन्न नुकसान झाले़ 

तीन वर्षे काम सुरूच- सन १९७६ मध्ये सीना नदीवर बंदलगी येथे हा को.प. बंधारा बांधण्याचे काम सुरु झाले.तीन वर्षात बंधारा पूर्ण झाला आणि १९८० पासून सिंचनासाठी बंधाºयाच्या पाण्याचा उपयोग सुरू झाला. गेल्या तीन वर्षांपासून या बंधाºयाचे काम सुरूच आहे. आजदेखील ते अर्धवट स्थितीत आहे.त्यामुळे यंदातरी बंधाºयात पाणीसाठा होईल का याची चिंता शेतकºयांना लागून राहिली आहे.

बंधाºयाचे काम वेगाने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने मध्यंतरी काम थांबवले होते. त्यामुळे विलंब झाला. आता त्याची मुदतही संपली आहे. लेखी ताकीद दिल्याने काम लवकर पूर्ण करण्याची त्यांनी हमी दिली त्यामुळे त्यालाच मुदतवाढ देऊन काम पूर्ण करून घेऊ. येत्या पावसाळ्यात पाणीसाठा होईल अशी स्थिती आहे.- नारायण जोशी,कार्यकारी अभियंता , भीमा विकास विभाग क्र. २ सोलापूर

जानेवारी २०१९ मध्ये बंधाºयाचे काम पूर्ण करण्याची हमी अधिकाºयांनी दिली होती़ पावसाळा तोंडावर आला आहे, तरी काम पूर्ण झाले नाही. लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. आमचा पाठपुरावा सुरूच आहे. आता नव्याने आंदोलन हाती घेण्याशिवाय पर्याय नाही़- कांशीराम गायकवाडमाजी सरपंच, बोळकवठा

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयriverनदीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक