अडप झडप सोलापुरचे खासदार शरद बनसोडे गडप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:13 IST2018-10-27T15:03:07+5:302018-10-27T15:13:25+5:30
युवक काँग्रेसचे बनसोडे यांच्याविरोधात निर्दशने

अडप झडप सोलापुरचे खासदार शरद बनसोडे गडप !
सोलापुर : सोलापुर : अडप झडप खासदार गडप़़़आपण यांना पाहिले का़ख़ासदारांना पहिल्यास बक्षीस मिळवा असे एक ना अनेक घोषणा देत सोलापुरातील युवक काँग्रेसच्यावतीने निर्दशने करण्यात आली.
भाजपाचे खासदार शरद बनसोडे आणि काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांच्यातील शाब्दीक वाद पेटले आहे. खा. बनसोडे यांनी आ. प्रणिती शिंदे यांच्यावर टिका करताना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या विरोधात शनिवारी निर्देशने केली.
आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील सभेत बोलताना खा. बनसोडे यांना ‘बेवडा’ म्हटले होते, त्याला प्रत्युत्तर देताना खा. शरद बनसोडे यांनी मुंबईत तुमचे काय काय चालते ? हे सांगितले तर सोलापुरात फिरणे मुश्किल होईल, मुंबईतील त्या गोष्टी सांगू का ? असे आवाहन दिले होते़. त्यावरून संतापलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्याविरोधात निर्दशने केली. आपण यांना पाहिलात का ? आपण यांना ओळखता का ? असे प्रश्नही उपस्थित केले. यावेळी अंबादास करगुळे, विनोद भोसले, सैफन शेख आदी उपस्थित होते़