शरद पवारांनी स्वीकारले काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण, लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार!

By राकेश कदम | Published: December 24, 2023 07:09 PM2023-12-24T19:09:14+5:302023-12-24T19:10:47+5:30

सत्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांचीही उपस्थिती असावी असा काँग्रेस नेत्यांचा आणि सत्कार समितीचा आग्रह होता. 

Sharad Pawar accepted the invitation of Congress leaders will soon visit Solapur | शरद पवारांनी स्वीकारले काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण, लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार!

शरद पवारांनी स्वीकारले काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण, लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार!

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरातील काँग्रेस नेत्यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. लवकरच ते सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी रविवारी सांगितले.

काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ २० जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांचीही उपस्थिती असावी असा काँग्रेस नेत्यांचा आणि सत्कार समितीचा आग्रह होता. 

सत्कार समितीचे प्रमुख देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक नरसिंग कोळी यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी नेत्यांनी पवारांची भेट घेतली. पवारांनी काँग्रेस नेते, सत्कार समितीचे निमंत्रण स्वीकारले. पवार सोलापुरात येणार आहेत. या दिवशी राष्ट्रवादीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे उपस्थित राहणार असल्याचे भारत जाधव यांनी सांगितले.

यापूर्वी रद्द झाला होता सोलापूर दौरा

सिद्धेश्वर सहकारी बॅंकेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, राजशेखर शिवदारे यांनी दिले होते. पवारांनी हे निमंत्रण स्वीकारले होते. परंतु, हा दौरा अचानक रद्द झाला होता.

Web Title: Sharad Pawar accepted the invitation of Congress leaders will soon visit Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.