सोलापूर : यापूर्वीच्या सरकारने शेतकºयांबाबतीत कर्जमाफीचे रान उठवले़ त्यांना नादी लावले़ शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री होते़ त्यांच्याच काळात साडेतीन लाख शेतकºयांनी आत्महत्या केली़ आज शेतकºयांच्या आत्महत्येमागे ते भाजपाला जबाबदार धरताहेत, ते बोलतात तसे कधीच वागत नाहीत़ प्रत्येकवेळी त्यांनी भूमिका बदलली आहे़ उलट भाजपाने शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शाश्वत शेतीसारख्या उपाययोजना राबविल्याचे भाजपाचे प्रवक्ते तथा सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी गणेश हाके म्हणाले़
६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असून, यानिमित्त त्या दिवशी मुंबईत वांद्रे (पूर्व) बीकेसी ग्राउंडवर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे़ हा मेळावा यशस्वी करण्यासाठी हाके हे मंगळवारी सोलापूर दौºयावर आले होते़ श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य करत वरील आरोप केला़ यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, राजकुमार पाटील, महिला सचिव स्वाती जाधव आणि अशोक खटके उपस्थित होते़
यावेळी पक्षाच्या वाटचालीवर बोलताना एकेकाळी पक्ष महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर होता, असे म्हणाले़ आज सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाकडे पाहिले जाते़ राज्यात १३ महापालिका, १० जिल्हा परिषदांवर भाजपाचे वर्चस्व आहे़ महाराष्ट्रात ९३ हजार बूथ आहेत़ एक बूथ दहा युथ संकल्पनेतून पक्षबांधणी मजबूत झाली आहे़ दहा सदस्यांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या पक्षाचे देशभरात ११ कोटी सदस्य आहेत़ महाराष्ट्रात एक कोटी सदस्य आहेत़
हाके उवाच...
- - यापूर्वी कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी महामंडळे वाटली जात होती़
- - ब्रिटिशकालीन कायद्यांचा त्रास होतोय़ या सरकारने असे १८०० कायदे रद्द केले आहेत़
- - विरोधकांचे अर्धा डझन मंत्री जेलमध्ये होते़ भाजप सरकारची लोकप्रियता कमी करण्यासाठी बदनामी करीत सुटले आहेत़
- - शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना उशिराने शहाणपण सुचत आहे़
- - उत्तम अर्थव्यवस्था भाजपा सरकार राबवित आहे़ विरोधकांच्या काळात विकासाचा दर ४़४ होता़ यापूर्वी ७० वर्षात कोणत्याही सरकारने एवढे वेगाने काम केले नाही़
प्रकाश आंबेडकरांना सोयीनुसार कळते़....भिडे गुरुजींना अटक करण्यात या सरकारकडे काय तांत्रिक अडचणी आहेत, या प्रश्नावर बोलताना हाके म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या इतके संविधान कोणाला कळत नाही़ कळालेच तर त्यांना सोयीनुसारच कळते़ कायदा सर्वांसाठी सारखाच आहे़ भिडे यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, असेही हाके म्हणाले़