सुजल पाटील
सोलापूर : डोक्यावर कडक ऊऩ़़रस्ता सुनसाऩ़़हातात कपड्यांची बॅग़़़एकही गाडी ये-जा करीत नव्हती़..आई व वडिलांचे हात धरून चिमुकले रस्ता भरभर पार करीत होते़..मिळेल अन् दिसेल तेथे पाण्याची तहान भागविली..जवळ असलेल्या चुरमुºयांवर तीन दिवस, दोन रात्र काढून २५० किलोमीटर चालत चालत कसेबसे सोलापूर गाठले..ग़ाडीची वाट पाहत विजापूर नाक्यावर थांबले असता पेट्रोलिंग करणाºया पोलीस गाडीतील अधिकाºयाने हटकले अन् रायचूरमधील त्या ५० जणांच्या १२ ते १५ फॅमिलीला मूळगावी जाता आले..
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनामुळे देशभरात २२ मार्चपासून देशभरात संचारबंदी जाहीर करण्यात आली़ या निर्णयामुळे पुणे, मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरात राहणारी मंडळी आपल्या गावाकडे परत जाऊ लागली़ अशातच पुणे (हडपसर) येथे सेंट्रिंग काम करणारे कुटुंंब आपले मूळगाव (गाव- गौनवाटला तांडा, लिंगसूर लमाण तांडा, जि़ रायचूर, राज्य - कर्नाटक) येथे जाण्यासाठी पुणे येथे गाडीची वाट पाहत थांबले होते़ एक, दोन नव्हे तब्बल चार ते पाच तास झाले एकही गाडी सोलापूरच्या दिशेने जात नव्हती़ अशातच कुटुुंबातील कर्त्या पुरुषाने हळूहळू चालत जाऊ़़़मिळेल तेथून गाडीने सोलापूर गाठू असे सांगत चालण्यास सुरुवात केली़़़़एक नव्हे तर तब्बल दोन दिवस हे सारं कुटुंब चालत चालत तब्बल २५० किलोमीटर अंतर पार करून सोलापूर गाठले.
दरम्यान, जवळ पैसे नसल्याने तीन दिवस, दोन रात्र फक्त चुरमुरे व पाण्यावर काढल्याचे त्या कुटुंबातील व्यक्तीने पोलिसांशी बोलताना सांगितले. रायचूरकडे जाण्यासाठी विजापूर नाका येथे थांबले असता पेट्रोलिंग करणारे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी त्या फॅमिलीला हटकले अन् कुठे जात आहात याबाबतची विचारणा केली़ विचारणा करता त्या फॅमिलीने सांगितलेली धक्कादायक कहाणी ऐकून त्या पोलीस अधिकाºयांचे मन स्तब्ध झाले़ डोळेही पाणावले अन् काहीच न बोलता थोडं थांबा तुमची व्यवस्था करतो असे सांगून निघून गेले़ तेवढ्यात त्या फॅमिलीच्या मदतीसाठी रविकांत पाटील युवा मंच व शिवसेना मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, विजापूर रोडचे संस्थापक सदस्य सकलेश बाभूळगावकर व शिवपुत्र वाघमारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले़ या सर्वांनी मिळून त्या फॅमिलीसाठी नाष्टा, चहा, पाण्याची व्यवस्था केली़ एवढेच नव्हे तर जेवणासाठीही त्यांना आग्रह धरला; मात्र त्या फॅमिलीने जेवण नको पण आम्हाला गावाला पोहोचवा अशी विनंती केली़ त्यानंतर पोलीस अधिकाºयांनी विजापूर रोडवरून जाणाºया दोन गाड्या थांबवून त्या ५० लोकांना त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली.
खाकी वर्दीतली ‘ती’ माणुसकी आली कामाला- पुण्याहून चालत आलेल्या त्या ५० लोकांना रायचूर (राज्य - कर्नाटक) येथे पोहोचविण्यासाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस कॉन्स्टेबल देविदास वाल्मीकी, मोहन वजमाने, बीट मार्शल नितीन गायकवाड, बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले़ याचवेळी रविकांत पाटील युवा मंच व शिवसेना मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, विजापूर रोडचे संस्थापक सदस्य सकलेश बाभूळगावकर व शिवपुत्र वाघमारे, पंजनाथ वाघमारे, विठ्ठल जाधव, प्रशांत वाघमारे, प्रफुल्ल वाघमारे, मरगूर यांनीही मोलाची मदत केली़ एवढेच नव्हे तर त्या कुटुंबीयांची आपल्या परिवारासारखी विचारपूस करून दिलासा दिला़ शेवटी जाताजाता त्या कुटुंबीयांनी सोलापूर शहर पोलीस दलाचे मन:पूर्वक आभार मानत माणुसकी अजूनही जिवंत आहे असं बोलत गाडीत बसले़
कोरोनाच्या भीतीने एकानेही केली नाही मदत़- एकमेकांच्या संपर्कात व गर्दी केल्याने कोरोना आजार पसरतो हे सांगितल्यामुळे आजकाल कोणीही एकमेकांच्या मदतीला धावून येत नसल्याचे पाहावयास मिळत आहे़ कोरोना आजाराची भीती आता माणुसकीला लांब ठेवत चालल्याचे पाहावयास मिळत आहे़ पुण्याहून सोलापूर गाठलेल्या त्या कुटुंबीयांना कोरोनाच्या भीतीनेच कोणीही मदत केली नाही़ शिवाय गाडीतही बसविले नाही़ त्यामुळे त्या कुटुंबीयांना चालत चालत पुण्याहून सोलापूर गाठावे लागले़
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी मला मोबाईलवर फोन करून त्या कुटुंबीयांना मदत करण्याचे सांगितले़ तातडीने मी संबंधित माझ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ५० लोकांच्या चहा, पाण्यासह नाष्टाची सोय केली़ - सकलेश बाभूळगावकर,सामाजिक कार्यकर्ते, सोलापूर