शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

घटस्थापनेसाठी लागणारी माती विकून तिने केलीय घरच्या दसरा सणाची तजवीज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 2:49 PM

चिमुकल्यांसह जगण्याचा संघर्ष;  लोहारकामात पतीची मदत करून साहित्यांची विक्री

ठळक मुद्देशहरातील अनेक भागांत घटस्थापनेच्या साहित्यांची विक्र ी करणाºया महिलाशहरातील चौका-चौकात घटस्थापनेचे साहित्य विकणारे लोक दिसतातशारदीय नवरात्रोत्सवाचा सण हा स्त्री रुपातील शक्तीला वंदन करण्यासाठी असतो

शीतलकुमार कांबळे

सोलापूर :  शहरातील चौका-चौकात घटस्थापनेचे साहित्य विकणारे लोक दिसतात. त्यातही बहुतांश महिलाच असतात. शारदीय नवरात्रोत्सवाचा सण हा स्त्री रुपातील शक्तीला वंदन करण्यासाठी असतो. मात्र हीच शक्ती आपल्या घरी सणाची तयारी करण्याऐवजी तळपत्या उन्हात आपल्या तान्हुल्याला घेऊन घटस्थापनेसाठी लागणारी माती आणि अन्य साहित्याची विक्री करण्यासाठी बसलेली दिसून आली.  तुम्ही सण साजरा करणार नाही का, असा प्रश्न विचारल्यावर रुपाली आकाश चव्हाण या विक्रेत्या स्त्रीशक्तीने दिलेले उत्तर मनाला भिडणारे होते. त्या म्हणाल्या, त्यांच्या घरात घटस्थापना झाली तरच आमच्या घरात सण साजरा होईल...खरंच माती विकून घरच्या दसराची तजवीज करणाºया या नारीशक्तीचा संघर्ष भावणारा होता.

शहरातील अनेक भागांत घटस्थापनेच्या साहित्यांची विक्र ी करणाºया महिला दिसतात. त्या प्रत्येक महिलेची एक कहाणी असते. मोठ्या कष्टाने संसाराचा गाडा ओढणाºया आपल्या पतीला साथ देण्याची तर कधी स्वत:च पूर्ण संसार करण्याची जिद्द या स्त्रीशक्तीत असते. त्यापैकी एक म्हणजे रुपाली चव्हाण. त्यांचे पती हे लोहाराचा व्यवसाय करतात. त्यांच्या या कामात रुपाली चव्हाण या मदत करतात. मदत करणे म्हणजे घन चालविण्याचे काम, जे की खूप ताकद व मेहनतीचे असते. 

या कामातून वेळ काढून रुपाली चव्हाण या घटस्थापनेचे साहित्य विकण्यासाठी आल्या होत्या.सोरेगाव येथूून काळी माती आणून त्याची विक्री त्या करत होत्या. सोबतच पाच विविध प्रकारची फळे, घटाच्यावर असणारे मंडपी (सळईचे मंडप) यांचीही त्या विक्र ी करत होत्या.  स्वत: लोहार असल्यामुळे मंडपी त्यांनीच तयार केलेली होती. शनिवार व रविवार असे दोन दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत साहित्यांची विक्र ी करण्याचे काम त्या करत होत्या. 

हे सर्व करत असताना आपल्या दोन मुलांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याने एका मुलीला त्यांनी आपल्यासोबत आणले होते. दीड वर्षाच्या मुलीला उन्हाचे चटके बसू नयेत यासाठी तिच्या डोक्यावर आपल्या पदराचा आसरा त्यांनी केला. घटस्थापनेच्या साहित्यांची लवकर विक्री करुन त्यांना आपल्या घरी घटस्थापना करायची होती. अशा परिस्थितीत त्यांच्या चेहºयावरील हास्य शक्तीदेवीचेच प्रतिरुप दिसत होते.

असेही ग्राहक- एरव्ही मॉलमधून साहित्यांची खरेदी करत असताना त्याची किंमत विचारण्याची तसदी घेतली जात नाही. तर घटस्थापनेचे साहित्य खरेदी करताना अनेकांनी घासाघीस केल्याचे पाहायला मिळाले. घटस्थापनेचे साहित्य व फळांची किंमत ही अतिशय कमी असताना आणखी कमी किमतीत मागणारे ग्राहक होते. आम्हाला परवडले तर आम्ही विक्री करु नाहीतर करणार नाही, असे एका विक्रेत्याने सांगितले. तर सगळे साहित्य विक्री करुन मुहूर्त संपण्याच्या आत घरी घटस्थापना करायची असल्याने काही महिलांनी मिळेल त्या भावाने साहित्य विकले.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीagricultureशेती