छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिंगणापूर येथील मोठ्या महादेवाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने देवाचे सर्व उत्सव, पूजा साध्या व मोजक्याच लोकांमध्ये साजरा करावी असे आदेश दिले. या बंदी आदेशामुळे मंदिर परिसरातील दीडशे दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले.
महाशिवरात्रीवेळी शिंगणापूर नगरीत मेवामिठाई, बेलफुल, दवना, भस्म, पेढे, हळदी-कुंकू, बुक्का व हॉटेल अशा व्यवसायातून लाखो रूपयांपर्यंतची उलाढाल होत असते. या बंदीमुळे या व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपासून शिखर शिंगणापुरात व मंदिरात शुकशुकाट होता.
ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने गावाच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी केल्याने बाहेरील लोकांना गावात प्रवेश दिला नाही.
फोटो लाईन :::::::::::::::::::११पंड०७
शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर भाविकांविना असे ओस पडले असल्याचे दिसत आहे.