अक्कलकोट : तालुक्यातील नागणसूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातापालक दीपाली मणुरे होत्या. मातापालक जयश्री भासगी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवा संघटनेचे नागणसूर विभागप्रमुख रूपेश पाचापुरे यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. रेणुका प्रचंडे, काशीबाई मणुरे, भाग्यश्री धनशेट्टी, सौंदर्या पुजारी, कृतिका हडपद, भाग्यश्री धुमगोंडा, अंजली भासगी, संस्कृती भंडारी यांनी केलेल्या वेशभूषेने साऱ्यांचे लक्ष वेधले. विषय शिक्षक शरणप्पा फुलारी यांनी प्रतापगडावरील पराक्रम, पावनखिंड पराक्रम, गड आला; पण सिंह गेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग कथन केले. शिक्षिका लक्ष्मी दोडमनी यांनी पोवाडा सादरीकरण केले. यावेळी घेण्यात आलेल्या समान्य ज्ञान स्पर्धेत ईश्वरी नागलगाव आणि भाग घेतलेल्या विद्यार्थिनींना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका शांता तोळणुरे, कल्लय्या गणाचारी, जिंनेदभाषा नदाफ, शरणप्पा फुलारी, लक्ष्मीबाई देगाव, लक्ष्मीबाई दोडमनी, प्रेमा प्रचंडे यांनी परिश्रम घेतले.
---
फोटो : २० नागणसूर
जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.