शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सत्तेचा मुकूट शिवसेनेकडे पण विकास मात्र राष्ट्रवादीचा होतोय म्हणून काँग्रेस नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:33 IST

प्रविण दरेकरांचा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल

सोलापूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार ही काही महाविकास आघाडीची खाजगी मालमत्ता नाही . तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेवून आला नाहीत. लोकांच्या भावनेचा अनादर केला तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. महाविकास आघाडी म्हणजे आळवावरच पाणी आहे. ते अस्थिर आहेत. ते केवळ स्वबळाचे नारे देतात. हे सरकार कधी कोसळेल हे सांगता येत नाही. सत्तेचा मुकूट फक्त शिवसेनेकडे परंतु विकास राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा होत असल्याने कॉंग्रेसही नाराज असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. 

अकलूज येथे माळवाडी-अकलुज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत व्हावे या मागणीसाठी साखळी उपोषणास बसलेल्या तीन गावच्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 

राज्य सरकारला मायबाप म्हटले जाते. जनतेला न्याय देण्याचे काम मायबाप सरकार करते. पण आज २४ दिवस झाले येथील जनता न्याय हक्कासाठी उपोषणाला बसली असून महाविकास आघाडी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. राज्यात गेंड्यांच्या कातडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायती जाहीर करण्यासारखे छोटेसे काम ही हे सरकार करु शकत नाही ही दुर्देवाची बाब असल्याचीही टीका दरेकर यांनी केली. 

जर मागावून नगरपरिषद,नगरपंचायत दिली नाही तर हिसकावून घेवू. भाजपाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार या लढ्यात सहभागी होतील. मी मुख्यमंत्र्याकडे वेळ मागून  दुजाभाव करु नका असे सांगतो. अकलूज,नातेपुतेकरांचा लढा वाया जाणार नाही. न्याय मिळवून देवू, गांधीवादी लढाई यशस्वी झाली नाही तर क्रांतीची लढाई लढू पण न्याय मिळवून देवू असेही दरेकर म्हणाले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील,  उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, नंदिनीदेवी मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूज सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माळेवाडी (अ) सरपंच जालींदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, भाजप अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबु, ॲड रणजित भोसले, संजय गोरवे, नंदकुमार केंगार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरpravin darekarप्रवीण दरेकरmalshiras-acमाळशिरसVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील