शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा शिवाजीराव सावंत, सभापती विक्रमसिंह शिंदे, नगराध्यक्षा मिनल साठे,उपनगराध्यक्षा लक्ष्मी राऊत, माजी झेडपी सदस्य झुंजार नाना भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने, राजाभाऊ चवरे,गुरूराज कानडे,नगरसेविका सुप्रिया बंडगर,अनिता सातपुते, महात्मा फुले प्रतिष्ठानचे अजिनाथ माळी, दिनेश जगदाळे,शिवाजी जगदाळे, प्रमोद साठे,शहाजी चवरे, बाबा मस्के सुरेश भांगे, बाळकृष्ण गायकवाड, संग्राम भांगे, अक्षय भांगे, रोहित घळके, सागर भांगे, निलेश भांगे, जीवन ढेकळे,समाधान सुतार, अजिंक्य भांगे संतोष गलांडे कोहिनूर भांगे आदी उपस्थित होते.
सायंकाळी नगरसेविका संजीविनी भांगे ,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अनिता भांगे, डाॅ उमा पाटील ,प्रमीला भांगे,अॅड रत्नप्रभा जगदाळे,शितल मस्के आदी महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
साठे गल्ली तरुण मंडळ व विविध शासकीय कार्यालय परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. खैराव येथे रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सपोनि अमूल कादबने, फौजदार किरण घोंगडे, हवालदार अजहर शेख, बालाजी घोरपडे, चंद्रकांत गोरे, विलास देशमुख पंडित पाटील ,समाधान नागटिळक, संदीप मोटे, ज्ञानेश्वर सुतार, शरद नागटिळक, बाळासाहेब पाटील, तुषार नागटिळक, प्रताप पाटील आदीनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. पोलिसांच्या वतीने कापसेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. मानेगाव येथे इन्स्पायर फाऊंडेशन च्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची ३९१ रोपट्याची लागवड करण्यात आली. इन्स्पायर फाऊंडेशनचे बिरुदेव शेळके, नेताजी लांडगे, अशोक मसलकर, मारूती शिंदे, निरांजन देशमुख, बिरूदेव शेळके, नेताजी लांडगे, समाधान लांडगे, श्रीमती प्रमोधिनी लांडगे, शितल देशमुख यांनी यासाठी परिश्रम घेतले.
शिंदेवाडी येथे संघर्ष ग्रुप च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व मास्क चे वाटप करण्यात आले. माजी सरपंच संजय सावंत, संदीप शिंदे, रवळीनाथ शिंदे, सौदागर साळुंखे, रामभाऊ शिंदे, सुभाष शिंदे, कांतीलाल साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२०माढा-शिवजयंती
फोटो ओळी: माढ्यातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात छत्रपती शिव जन्मोत्सवानिमित्त पाळण्याचा कार्यक्रम पार पडला.