यावर्षी प्रथमच राजेंद्र पवार व तानाजी शिनगारे या दोघांना कार्यकारी मंडळात संधी मिळाली आहे. १९३४ मध्ये कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या विश्वस्तांची निवडणूक तीन वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती. जगदाळे मामांचे मानसपुत्र डॉ. बी. वाय. यादव हे १९८८ पासून एक अपवाद वगळता संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
हे आहे २०१८ चे विश्वस्त मंडळ
जून २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. बी. वाय. यादव, गुलाबराव पाटील, रामचंद्र बारसकर, सुभाष पाटील, पंडित पाटील, दिलीप रेवडकर, विष्णू पाटील, सुरेश पाटील, प्रकाश पाटील (पी.टी. पाटील ), नंदकुमार जगदाळे , डॉ. विलास देशमुख, जयकुमार शितोळे, शशिकांत पवार , सोपान मोरे, दिलीप मोहिते हे संचालक बिनविरोध निवडून आले होते.
----
आतापर्यंत हे सात जण झाले बिनविरोध
यंदाच्या निवडणुकीत पेट्रन गटातून डाॅ. बी.वाय. यादव, व्हाईस बेनिफॅक्टर गटातून डॉ. गुलाबराव पाटील, व्हाईस पेट्रन फेलो गटातून तानाजी शिनगारे, कायम सभासद गटातून राजेंद्र पवार, डॉ. विलास देशमुख, लाईफ वर्कर गटातून विष्णू पाटील व दिलीप रेवडकर हे सात जण बिनविरोध झाले आहेत.
---
या नऊपैकी एकाचा होणार पराभव
पहिला वर्ग व दुसरा वर्ग प्रवर्गातील आठ जागांसाठी सुरेश पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार जगदाळे, शशिकांत पवार, अरुण देबडवार, जयकुमार शितोळे, सोपान मोरे, दिलीप मोहिते व डॉ. प्रकाश बुरगुटे हे नऊ अर्ज शिल्लक राहिले आहेत. अद्यापही या नऊ जणांपैकी एकाने माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. माघार जर घेतली नाही तर यातील एकाचा पराभव होऊन आठजण विजयी होणार आहेत. या नऊ जणांमध्ये कोणाचा पराभव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----
जगदाळे मामा, डॉ. बी. वाय. यादव यांचा फोटो