अनगर : मिरवणूक, डीजे, वाद्ये, नाच यावर खर्च न करता या साऱ्या गोष्टींना फाटा देऊन शिवछत्रपती प्रतिष्ठान दाढे - खडूळवस्ती वाफळे येथील मंडळाने समाजातील गुणवंतांचा सन्मान करून आदर्श उभा केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेले प्रशांत डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये निवड झालेला स्वप्निल क्रुपाळ, बारावीमध्ये अनगर केंद्रात प्रथम आलेली साक्षी पाटील, दहावीत प्रथम आलेली निकिता दाढे, पूजा गवळी, प्रिया कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.
छत्रपती डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात शिरले पाहिजेत या उद्देशाने उपस्थित गुणवंतांना श्रीमानयोगी पुस्तक देऊन शाल, फेटा, हार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अजय खडूळ यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, उत्रेश्वर दाढे, भीमराव खडूळ, मेजर मोहन दाढे, डाॅ. अविनाश दाढे, भालुकाका दाढे, विनोद खडूळ, काकासाहेब जाधव, अजय खडूळ, प्रताप खडूळ, श्रीराम दाढे, ओंकार दाढे, गणेश दाढे, अमोल दाढे, विकास दाढे उपस्थित होते.
---
२५ अनगर
शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने वाफळेत गुणवंतांचा सत्कार करताना शरद पाटील, उत्रेश्वर दाढे, भीमराव खडूळ, मेजर मोहन दाढे, डाॅ. अविनाश दाढे