आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरीय कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रत्येक तालुकानिहाय बँकेत, सोसायटीत व इतर प्रमुख ठिकाणी लावावी अशी मागणी शहर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाओ आंदोलन करून करण्यात आले़ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची २००९ पासूनचे संपूर्ण कर्जमाफ करण्याचे जाहीर केले़ त्यानुसार विविध प्रकारचे शासन निर्णयदेखील प्रसिध्द केले़ मात्र अद्यापपर्यंत कोणत्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही़ तरी शासनाने त्वरीत कर्जमाफी करून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी गावपातळीवरील मुख्य ठिकाणी प्रसिध्द करावी या मागणीसाठी शहर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या़ यावेळी बँक प्रशासन अधिकाऱ्यांस शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले़ यावेळी जिल्हाप्रमुख महेश कोठे, शहर प्रमुख प्रताप चव्हाण, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, उपजिल्हा प्रमुख सुनिल शेळके, उमेश गायकवाड, शाहू शिंदे, विठ्ठल कोटा, भारत बडूरवाले, बाळासाहेब गायकवाड, नाना मस्के, उज्वल दिक्षित, राजकुमार हंचाटे, विद्यार्थी सेना संघटक महेश धाराशिवकर, परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे, भिमाशंकर म्हेत्रे, अमोल शिंदे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते़ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता़ -------------शरद बनसोडे यांच्याविरोधात घोषणाबाजीबेळगाळप्रश्नी वादग्रस्त वक्तत्व करणारे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ शरद बनसोडे हाय हाय़़़़बनसोडे तुम चले जाव यासह आदी घोषणाबाजी करून शिवसेनेने बनसोडे याच्या वादग्रस्त वक्तत्व्याचा निषेध केला़
शिवसेनेचे सोलापूरात ढोलबजाओ आंदोलन
By admin | Published: July 10, 2017 3:50 PM