सोलापूर : सोलापुरातील पॉझिटिव्ह 'कोरोना' बाधितांची संख्या तीन वाढतच आहे. शनिवारी एका दिवसात २३० जणांचे अहवाल प्राप्त झाले यात २१६ निगेटिव्ह तर १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज मृतांची संख्या ८ इतकी असून सोलापुरातील एकूण मृतांची संख्या ८३ झाली आहे.
आत्तापर्यंत सोलापूरात ७७०७ जणांची कोरोना चाचणी झाली असून ७०३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. ६७१ अहवाल प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत निगेटिव्ह ६१७१ अहवाल आले तर पॉझिटिव्ह अहवाल ८६५ झाले आहेत. आज रूग्णालयातून २९ जणांना घरी सोडण्यात आलं. यामुळं बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३८० झाली आहे तर ४०२ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
आज मृत खालीलप्रमाणे....
- गांधी नगर अ.कोट रोड ४५ वर्षीय पुरूष.
- नरसिंह नगर मोदी ६१ वर्षीय महिला.
- भवानी पेठ परिसर ७२ वर्षीय पुरूष.
- अवंतीनगर परिसर ६९ वर्षीय महिला.
- जुना विडी घरकुल परिसर ६७ वर्षीय पुरूष.
- बाळीवेस परिसर ६२ वर्षीय महिला.
- उत्तर कसबा परिसर ६१ वर्षीय पुरूष.
- वेणुगोपाल नगर ४१ वर्षीय पुरूष.
आज जे रूग्ण मिळाले त्यांची ठिकाणे पुढीलप्रमाणे
- उत्तर कसबा २ पुरूष.
- मरीआई चौक दमाणी नगर १ महिला.
- सरवदे नगर १ पुरूष.
- गांधी नगर अ.कोट रोड १ पुरूष.
- बुधवार पेठ १ महिला.
- जुना विडी घरकुल २ पुरूष, १ महिला.
- आंध्र तालीम लष्कर १ पुरूष.
- मोदी १ महिला.
- कुमठा नाका १ महिला.
- अंबिका नगर १ पुरूष.
- निलमनगर १ पुरूष.