आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सहाव्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवार, १३ डिसेंबर रोजी १:१५ वाजण्याच्या सुमारास राधाकृष्ण अपार्टमेंट, पद्मानगर येथे घडली.
भागवती प्रसाद ऊर्फ (मोंटू) सुभाष अन्नलदास (वय ३५, रा. प्लॉट नंबर ७०, वजरेश्वर नगर, पद्मानगर, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भागवती प्रसाद हा पद्मानगराजवळ राहत होता. काही महिन्यांपासून त्यास दारूचे व्यसन जडले होते. शिवाय तो कधीकधी विचित्र असा वागत होता.
बुधवार, १३ डिसेंबर रोजी १:१५ वाजण्याच्या सुमारास राधाकृष्ण अवेनू अपार्टमेंट, एकता नगरजवळ, सोलापूरच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत भागवती प्रसाद याच्या डोक्यास, हाता-पायास व छातीस जबर मार लागला होता. शिवाय त्याच्या डोक्यातून जास्त रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. एस. पोळ यांनी शासकीय रुग्णालय, सोलापूर येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉ. रामकृष्ण डोक यांनी पोलिसांना कळविले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत व एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.