मंगळवेढा : शहरातील चोखामेळा चौक येथील आयसीआयसीआय बँकेसमोर एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी 10.15 च्या सुमारास घडली आहे. आनंद शिवपुजे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील जखमी हा मूढवी या गावातील रहिवासी असून आरोपी याने मागील भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने खुनी हल्ला केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान खुनी वार करताना जखमी तरुणाने बँकेत प्रवेश केला व आरोपीला रोखून धरले होते. पोलिसांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेतले आहे. सेक्युरिटी दत्तात्रय गोडसे यांनी लागली धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे
यावेळी चोखामेळा चौकामध्ये लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाले होते ही घटना घडल्यामुळे बँकेत येणारे जाणारे अनेक शेतकरी व्यवसायिक ही घटना बघून परत जात होते बँक नियमानुसार उघडली होती या घटनेमुळे शहरात बातमी वाऱ्यासारखी पसरली होती बँकेचे कामकाज दोन तासाने पंचनामे होऊन सुरू झाले आहे
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक बापू पिंगळे, एपीआय आवटे हवालदार सुनील गायकवाड, तुकाराम कोळी, पी सी तांबोळी दत्तात्रय येलपले. जमीर मुजावर आदीजणांनी भेट दिली.