सोलापूर : हॉटेल जंगली येथे राहणाºया तुळसाबाई पूर्णानंद कोरे (वय २५) या महिलेने पतीने संशय घेतल्याच्या कारणावरून विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. तुळसाबाई कोरे यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे.
धक्कादायक; पतीने संशय घेतल्याने विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 2:37 PM