सोलापूर - कोरोनामुळे जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला असून यात शहरातील पाच तर ग्रामीण हद्दीतील दोन जणांचा समावेश आहे. शहरात २१० तर ग्रामीणमध्ये ३९१ रुग्ण वाढले आहेत.
महापालिका हद्दीत १४७५ चाचण्यांमधून २१० रुग्ण सापडले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या ९० जणांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. मृतांमध्ये मिन्नत नगर सैफूल परिसरातील ४६ वर्षीय पुरुष, स्वामी विवेकानंद नगर विजापूर रोड परिसरातील ६६ वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन भागातील ७२ वर्षीय पुरुष, ओंकार अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी परिसरातील ७९ वर्षीय पुरुष, आत्मविश्वास नगर माशाळ वस्ती येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ग्रामीण हद्दीत ५ हजार १७८ चाचण्यांमधून ३९१ रुग्ण आढळून आले. १४४ बरे झाले आहेत. मृतांमध्ये कोळेगाव ता. मोहोळ येथील ३९ वर्षीय पुरुष, तांबवे ता. माढा येथील १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.