सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील कर्जाळ परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर भर रस्त्यावर उलटला. यामध्ये क्लीनर राहुल रामकिसन खिलारे (वय २५, रा.औंढा, जि.हिंगोली) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. क्रेन, जेसीबीच्या साहाय्याने टँकरच्या केबिन फोडून मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना पाच तासांनंतर यश आले.
फिर्याद पोलीस पाटील रूपाली इंगळे (रा.) यांनी दिली असून, चालक शिवाजी कैलास कुटे (रा.ओढा) हा पळून गेला आहे. शहाबादहून पुण्याकडे जाणारा टँकर (एमएच ४६६५३२) भरधाव वेगात असल्याने उलटला. त्यात क्लीनर गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला, तर सुधाकर बुधवंत हा जखमी झाला. क्रेन, जेसीबीने टँकरचे केबिन फोडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल पाच तास लागले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीराम मोरे हे करीत आहेत.
------
वाहतूक ठप्प...
सोलापूर-अक्कलकोट रोडवर झालेल्या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शेकडो वाहने अपघातग्रस्त टँकरला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने मृतदेह व जखमींना बाहेर काढले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.