टेंभुर्णी : माढा तालुक्यात कोंढार भागातील टाकळी येथून १७ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या एका युवकाचे धडावेगळे झालेले शिर इंदापूर तालुक्यात गणेशवाडी जवळील भीमा नदीपात्रात आढळले.संजय गोरवे (वय २३) असे त्या युवकाचे नाव असून २० जानेवारी रोजी धडावेगळे शीर आढळून आले.
इंदापूर पोलिसांच्या मते संजय गोरवेंचास खून हा अनैतीक सबंधातून झाला असण्याची शक्यता वर्तवली असून याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे विकी उर्फ व्येंकटेश विजय भोसले व महेश प्रभाकर सोनवणे (दोघे रा. टाकळी ता. माढा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संजय गोरवेचा मृतदेह मिळाल्यानंतर अवघ्या सहा तासात या प्रकरणाचा छडा लावण्यात आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
त्यांना इंदापूर न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली. १७ जानेवारी रोजी मयत संजय गोरवे हा बेपत्ता झाला होता.दुस-या दिवशी त्याच्या नातलगांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. २० जानेवारीला सकाळी ७ वाजता गारअकोले ते गणेशवाडी या गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाखाली नदीपात्रात शीर व हात-पाय धडावेगळे केलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तपास पथक नेमूण चक्रे वेगाने फिरवली. या कारवाईत पोलीस कर्मचारी दाजी देठे, हवालदार के.बी.शिंदे, पोलीस नाईक जगदीश चौधर,पोलीस शिपाई एस.जी.नगरे, अमोल गायकवाड, आरिफ सय्यद गुन्ह्याच्या शोध कार्यात सहभाग नोंदवला.