सोलापूर : राजस्थानहूनहैदराबादकडे कत्तलीसाठी जाणाºया १४ उंटांचा मालट्रक हैदराबाद रोडवरील एका हॉटेलसमोर पकडण्यात आला. चालक व क्लीनर या दोघांना पकडण्यात आले असून, मालक मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. आतील उंटांना बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यातील चार उंट मरण पावले. सध्या १0 उंट हे जिवंत आहेत. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली. चालक, क्लीनरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चालक आह महंमद नूरहनी रजपूत, क्लीनर परवेज नानू कुरेशी (दोघे रा. जि. बागपद राज्य- उत्तरप्रदेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत तर मालक इद्रीस कासार हा मालट्रक पकडल्यानंतर पळून गेला. अधिक माहिती अशी की, गोरक्षक शनिवारी सायंकाळी ५.३0 वाजता हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड येथे थांबले होते. दरम्यान, एक मालट्रक (क्र.यु.पी १७ ए.टी.0४१२) हा हैदराबादच्या दिशेने जात होता. दरम्यान, आतून जनावरे हंबरण्याचा आवाज त्यांना आला.
गोरक्षकांनी मालट्रक अडवला. आतमध्ये काय आहे अशी विचारणा चालकाकडे केली. चालकाने उंट असल्याचे सांगितले. हे उंट राजस्थान येथून आण्यात आले असून, ते कत्तलीसाठी राजस्थान येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
गोरक्षकांनी तत्काळ पोलिसांना बोलावून मालट्रक शेळगी येथील पोलीस चौकीजवळ नेला. मालट्रकमध्ये पाहिले असता आतमध्ये निर्दयीपणे चौदा उंट भरल्याचे दिसून आले. उंटाच्या दोन्ही पायांना बांधण्यात आले होते.
अधिक चौकशी करीत असताना मालक इद्रीस कासार हा पळून गेला. मालट्रक मरिआई चौकातील अंतरिक्ष गोशाळेत नेण्यात आला. आतील उंटांना बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यातील चार उंट मरण पावले. सध्या १0 उंट हे जिवंत आहेत. याची पोलिसात नोंद झाली आहे. भारतीय कृषीगोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, शहराध्यक्ष विजय यादव, गोरक्षक सिद्धू भाईकट्टी, प्रशांत परदेशी, यतीराज व्हनमाने, समर्थ बंडे, किरण पंगुडवाले, संकेत आटकळे, मनीष जाधवांनी, विठ्ठल सरवदे, प्रतिक्षीत परदेशी यांनी ही कामगिरी केली.
उंटांना दिले होते भुलीचे इंजेक्शन : सुधाकर बहिरवाडे- प्रवासादरम्यान आवाज करू नये यासाठी मालट्रकमध्ये निर्दयीपणे भरण्यात आलेल्या १४ उंटांना भुलीचे इंजेक्शन देण्यात आले होते. नाकामध्ये हुक्क घालण्यात आले होते. दोन्ही पायांना दोरी बांधण्यात आली होती. राजस्थानहून निघालेला मालट्रक हैदराबाद येथे पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. इतक्या मोठ्या प्रवासात उंटांना निर्दयीपणे उभे करून बांधण्यात आले होते. त्यांना चारा, पाणी अशी कोणतीही सुविधा दिसत नव्हती. संशय आल्याने आम्ही तपासणी केली आणि दहा उंटांना वाचवू शकलो अशी माहिती भारतीय कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी दिली.