बार्शी : गाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटरमधील रुग्णांची तपासणी करत असताना क्वारंटाईन केलेले चार जण पळून गेले़ त्यांनी कोविड-१९ चा संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य केल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध भुजबळ यांनी बुधवारी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार साथीच्या रोगप्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
गाडेगाव रोडवरील मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर तयार केले आहे. तेथे कोरोनाच्या अनुषंगाने हायरिस्कचे रुग्ण क्वारंटाईन केले होते़ त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांच्या आदेशानुसार त्यांची तपासणी केली जाते़ त्यानुसार ६ जुलै रोजी तक्रारदार अधिकारी तपासणी करताना हे चौघे आढळून आले नाहीत़ त्यामुळे त्यांनी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसात तक्रार दिली.