आप्पासाहेब पाटीलसोलापूर : दुपारी बाराची वेळ...मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मार्डी (ता़ उ़ सोलापूर) येथे आंदोलन सुरू़...रस्त्यांवर टायर पेटवून वाहतुक अडविण्यात आली होती़...याच दरम्यान अत्यावस्थ रूग्णाला घेऊन जात असलेली एमएच १४ सीएल ०६३६ या क्रमाकांची एक रूग्णवाहिक तेथे आली़...पण याच रस्त्यांवर मोठया प्रमाणात टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या जळत असल्याने चालकाला रूग्णालयास जाण्यासाठी मार्गच नव्हता़...अशावेळी चालकाने जीव धोक्यात घालून त्या पेटत असलेल्या जाळ्यातूनच रूग्णवाहिका नेली अन अत्यावस्थ रूग्णाला वेळेत रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी बंदची हाक दिली होती़ त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात व गावात बंद पाळण्यात आला़ याचवेळी शासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवर टायर पेटवून वाहतुक अडविली होती़ दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी मार्डी - तुळजापूर व मार्डी - सोलापूर या मार्गावर टायर पेटवून रस्ता अडविला होता़ याचवेळी दुपारी एकच्या सुमारास या मार्गावरून अत्यवस्थ रूग्ण घेऊन जात असलेली एमएच १४ सीएल ०६३६ या क्रमाकांची रूग्णवाहिका आली़ मात्र रस्त्यांवर मोठया प्रमाणात टायर पेटत असल्याने तेथुन मार्ग काढणे कठीणच होते़ मात्र रूग्णवाहिकेच्या चालकाने जीव धोक्यात ती रूग्णवाहिका चक्क जाळातूनच बाहेर काढून त्या रूग्णाला वेळेव उपचारासाठी पोहचविण्यात यश मिळविले़ जर वेळेत ही रूग्णवाहिका रूग्णालयापर्यंत पोहचू शकली नसती तर एकाचा जीव जाण्याची वेळ आली असती हेही तितकेच खरे़़़ यावेळी मार्डी येथील मराठा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी याकामी मोठी मदत केली़