माढा : पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेल्या विमल विलास आतकरे वय (४८) यांचा सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात केस व पदर अडकल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार 2 रोजी दुपारी एकच्या सुमारास माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे घडली आहे.
यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून यामुळे उडीद सोयाबीन मका ही पिके मोठ्या प्रमाणात जोमाने आले आहेत. अचानक होणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ट्रॅक्टरच्या मळणी यंत्राद्वारे धान शेतकरी करण्यास प्राधान्य देतात. तर बुद्रुकवाडी येथील विष्णू दळवी यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या मळणी साठी बाळासाहेब उदगे यांचे मळणी यंत्र शेतात सुरू झाले थोडीफार रास झाली यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम सुरू असताना याठिकाणी विमल आतकरे यांच्या सह चार महिला व दोन पुरुष मळणीचे काम करीत होते. यावेळी विमल आतकरे या मळणी यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम करत असताना त्यांचे अचानक केस आणि पदर मळणी यंत्राच्या सॉफ्टमध्ये अडकल्याने चालू असलेल्या मळणी यंत्राने त्यांना खेचून घेतले.
मळणी यंत्र बंद करेपर्यंत त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यावेळी सोयाबीनच्या खळ्यावर रक्ताचा सडा पडला होता. त्यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली सासू-सासरा असा मोठा परिवार आहे.
खळ्यात रक्ताचा सडा...या अनुसूचित घटनेने मयत विमल यांना ओरडत आहे आले नाही आणि क्षणात मुंडके आणि धड वेगळे झाल्याने रक्ताच्या चिळकांड्या वरून खळ्यात रक्ताचा सडा पडला होता. बुद्रुकवाडी येथे समर्थ रामदास दासबोध बैठकीसाठी त्यांनी योगदान दिले होते तर वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या अनुयायी असल्याने त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच गावात शोकाकुल वातावरण झाले होते.