शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

धक्कादायक; दिरासोबतच्या संबंधांमध्ये आड येणाऱ्या आईचा मुलीनेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:07 PM

घरासमोरील चपलांमुळे पोलिसांनी केले आरोपींना अटक; मुलीने हात पकडले तर दिराने आवळला गळा

ठळक मुद्देखून करण्यासाठी अनिता आणि शिवानंद हे दुचाकीवरून आल्याची माहिती पोलिसांना मिळालीआरोपींचा शोध घेण्यासाठी विजापूर नाक्याचे पोलीस रात्रीच कर्नाटकातील तोरवी गावाला गेलेघरासमोर सोडलेल्या चपलांवरून आरोपींना पकडले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली

 सोलापूर : आपल्या दिरासोबत असलेल्या संबंधांमध्ये आड येणाऱ्या आपल्या आईलाच मुलगी अनिता महादेव जाधव हिने दिराला हाताशी धरून गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विजापूर नाका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. लक्ष्मीबाई माने यांचा खून रविवारी उघडकीस आला होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत लक्ष्मीबाईचे जावयासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे चिडून मुलीने आपल्या दिरासोबत संबंध ठेवले. यामुळे आई लक्ष्मीबाई आणि मुलगी अनिता यांचे भांडण होत होते. दरम्यान, आई आपल्यावर भानामती करत असल्याचा संशयही अनिताला येत होता. यामुळे आपल्या आईचा काटा काढण्यासाठी तिने कट रचला. ७ नोव्हेंबरला कर्नाटकातील विजापूरजवळील तोरवी येथून ती आईकडे आली. तिने आपल्या आईचा मोबाईल बंद केेला. त्यानंतर आईचे हात पकडले. आईचा आवाज येऊ नये म्हणून तिच्या तोंडात टॉवेल कोंबला. दीर शिवानंद याने लक्ष्मीबाईचा गळा आवळला. त्यानंतर ते दोघे तेथून पळून गेले. हे पोलीस तपासात उघड झाले.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सपोनि शीतलकुमार कोल्हाळ, डीबी पथकाचे राजकुमार तोळणुरे, शावरसिद्ध नरोटे, श्रीरंग खांडेकर, सचिन सुरवसे, आयाज बागलकोटे, प्रकाश निकम, बटाणे, विशाल बोराडे आदींनी केली

चपलांवरून पकडले चोर

खून करण्यासाठी अनिता आणि शिवानंद हे दुचाकीवरून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी विजापूर नाक्याचे पोलीस रात्रीच कर्नाटकातील तोरवी गावाला गेले. तेथे आरोपींना पकडण्यासाठी साठ ते सत्तर दुचाकी वाहने पाहिली. शेवटी त्यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये एक दुचाकी आढळली. त्या गाडीच्या नंबरवरून आरोपीच्या घराचा शोध लावला; पण घर तेच आहे का नाही, हे पाहण्यासाठी घरासमोर सोडलेल्या चपलांवरून आरोपींना पकडले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली़  

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसMurderखून