सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालली असून शनिवारी एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे.
जिल्ह्यात शनिवारी दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, करमाळा, पंढरपूर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ दक्षिण सोलापुरातील कंदलगाव येथे दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे दक्षिण सोलापूर वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे तर उत्तर सोलापुरातील मार्डी पुन्हा रुग्ण आढळले आहेत.
एका आमदाराचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे़ शहरातील सर्व नगरसेवक व राजकीय कार्यकर्ते पॉझिटिव्ह आलेले ते आमदार कोण आहेत, याबाबत एकमेकांना चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे सोलापूर शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात या विषयावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सध्या जिल्हा नियोजन सभागृहात सर्व अधिकाºयांची बैठक घेत आहेत. सोलापुरात संचारबंदी कधीपासून लागू करावी या काळात कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे या विषयावर त्यांची चर्चा सुरू आहे.