कुर्डूवाडी : येथील आंतरभारती विद्यालयाच्या नजीक राहणाºया वयोवृद्ध दाम्पत्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली आहे. सुशीला नवनाथ कदम (वय ६५ ) व नवनाथ भगवान कदम ( वय ७५) अशी दाम्पत्यांची नावे आहेत.
नवनाथ कदम हे महावितरणचे निवृत्त कर्मचारी होते. निवृत्त होऊन त्यांना सुमारे १७ वर्षे झाले होते. नवनाथ कदम व सुशीला कदम या दाम्पत्यांला तीन मुले असून दोन शिक्षक व एक व्यावसायिक आहे. जीवनाच्या उत्तरार्धात सुशीला कदम यांनी घराच्या वरच्या मजल्याच्या किचनमध्ये तर नवनाथ कदम यांनी बेडरूममध्ये लोखंडी अँगलला दोरीने लटकून आत्महत्या केल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत मुलगा तानाजी कदम यांनी पोलिसात खबर दिली असून त्याबाबत आकस्मिक निधन म्हणून पोलिसात नोंद झाली आहे.