शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

धक्कादायक; नर्मदा, सिद्धार्थ हाॅस्पिटलमधील रुग्ण २४ तासांत इतरत्र हलविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 5:32 PM

सोलापूर महापालिकेची नाेटीस : अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यास केली कुचराई

साेलापूर : अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यास विलंब केल्याप्रकरणी नर्मदा मल्टिस्पेशालिटी आणि सम्राट चाैकातील सिद्धार्थ हाॅस्पिटलचे नाेंदणी प्रमाणपत्र बुधवारी सायंकाळनंतर निलंबित करण्यात येत आहे. येथील रुग्ण २४ तासांत इतरत्र हलविण्यात यावेत, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी नाेटीस मनपाच्या आराेग्य अधिकारी डाॅ. अरुंधती हराळकर यांनी मंगळवारी दिली.

राज्यात गेल्या दीड वर्षात काही रुग्णालयात आग लागून अनेक जणांचा बळी गेला. राज्य सरकारने रुग्णालयांमध्ये अद्ययावत अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांनी शहरातील रुग्णालयांची बैठक घेऊन अद्ययावत यंत्रणा उभारणीचे आदेश मे महिन्यात दिले हाेते. काही रुग्णालयांनी कार्यवाही सुरू न केल्याने १२ मे आणि ४ जून राेजी नाेटीस देण्यात आली. तरीही शहरातील १२ रुग्णालयांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ६ ऑगस्ट राेजी ४८ तासांची मुदत दिली हाेती. ही मुदत संपली तरी नर्मदा आणि सिद्धार्थ हाॅस्पिटलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा उभारणीस सुरुवात झाली नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून रुग्ण, कर्मचारी, नागरिक यांच्या जीवाशी खेळ करणारा आहे. मनपा महाराष्ट्र शुश्रूषागृहे अधिनियमन १९४९ अंतर्गत प्रमाणपत्र २४ तासांत रद्द करीत आहे. आपल्याकडील आंतररुग्णांची इतरत्र साेय करण्यात यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास हाॅस्पिटल व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशाराही डाॅ. हराळकर यांनी दिला आहे.

ही रुग्णालयेही रडारवर

शहरातील सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी, कृष्णा, फिनिक्स, निर्मल, लाेकमंगल जीवक, विनीत, साेलापूर पाइल्स केअर, श्री बालाजी, नान्नजकर या रुग्णालयांनी आठ दिवसांपासून अग्निसुरक्षा यंत्रणा उभारणीस प्रारंभ केल्याचा दावा केला आहे. काम पूर्ण करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काम पूर्ण न झाल्यास या रुग्णालयांवरही गुन्हा दाखल हाेणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या