पंढरपूर : पोलीस अधिकार्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पैसे मागण्याचा प्रकार पंढरपूरमध्ये घडत आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी माझे अकाऊंट हॅक झाले आहे, कोणी पैसे मागितले तर पाठवू नका असे आवाहन केले आहे.
मागील महिन्याभराच्या कालावधीमध्ये शहरातील विविध भागातील नागरिकांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. त्या फेसबुक अकाऊंट वरून अश्लील शिवीगाळ करण्यात येत आहे. या पीडित लोकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज देखील केला आहे. तक्रारी अर्ज येतातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सायबर सेल कळविले आहे.
______________________माझ्या फेसबुक अकाऊंट हॅक करून डमी अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर मेसेंजर चा उपयोग करून माझ्या जवळच्या मित्रांना पेटीएम द्वारे पैसे मागण्याचा प्रयत्न होत आहे. तरी कोणाला असा मेसेज आला तर फोनवरून खात्री करा. असा प्रकार इतरांशी घडू नये यासाठी त्यांनी त्यांचे फेसबुक प्रोफाईल ब्लॉक करून ठेवावेत.
- किरण अवचारवरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर