सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.
सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. आधीचे पैसे मिळाले, पण उशिराने नेलेल्या उसाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत होते. अखेर पाटील यांनी विषारी औषध पिऊन जीवन संपवले. खिशात ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस आला.
चिठ्ठीतील मजकूर....माननीय पोलीस पाटील यांच्याशी, मी स्वत: आत्महत्या करण्याबाबत तीन महिने झाले कारखाना बिल देत नाही. शेतात खत घालायचे राहिले. परवाच एप्रिलमध्ये लहान मुलाचे लग्न झाले. हातात काही एक पैसा नाही. मला व माझ्या मिसेसला दवाखान्याचे खर्च चालले आहे. महागाई तर अशी जळत आहे. लोकांचे पैसे द्यावयाचे आहेत. घरखर्च, लाईट बिल आणि भावाच्या मुलीचे लग्न आले आहे, याचा विचार करून मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझे कोणावरही आरोप नाहीत.