सोलापूर : पेट्रोल पंपासमोरील झाडाची फांदी तारांना स्पर्श करत असल्याने तेथे ठिणग्या उडत असल्याने झाडाची फांदी कापण्यासाठी गेलेल्या वृद्धाला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. सुभाष नरहरी भरगंडे ( वय ७५, रा. केशेगाव सराटी, तुळजापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी परिसरातील पेट्रोल पंपावर घडली.
सुभाष भरगंडे हे मागील अनेक दिवसांपासून तांदूळवाडी परिसरातील पेट्रोल पंपमध्ये काम करत होते. पण पेट्रोल पंपाच्या समोरील झाडाची फांदी तारांना स्पर्श करत असल्यामुळे तिथे ठिणग्या उडत होते. यासाठी झाडांचे फांदी कट करण्यासाठी ते व त्यांचे सहकारी कर्मचारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गेले. त्यावेळी ते सीडी पकडून खाली थांबले होते व एक कर्मचारी फांदी कापण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांचा तारांना स्पर्श झाल्यामुळे वर गेलेला कामगार खाली पडला. त्याचवेळी खाली सिडी पकडलेले सुभाष यांना विजेचा मोठा झटका बसला. यामुळे त्यांना ते जागीच बेशुद्ध पडले. यामुळे त्यांना लगेच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.