ठळक मुद्दे- संबंधित शेतकºयास शासनाने त्वरीत मदत करण्याची मागणी- मृत मासे पाहण्यासाठी परिसरातील शेतकºयांची मोठी गर्दी- मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद, पुढील कार्यवाही सुरू
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा दुष्काळी तालुका आह़े़ हाजापुर येथील माळरानांवर तरुण शेतकºयाने मासे व्यवसाय चालू करण्यासाठी १४ हजार मासे शेततळ्यात सोडले होते. मात्र विषबाधा होऊन मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे साधारण दोन ते तीन लाखाचे नुसकान झाले आहे. सुनिल कारंडे यांच्या शेततळ्यातील मासे मोठया प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने दुर्गंधी सुटली आहे. मासे मृत्युमुखी पडल्याची माहिती सुनिल करांडे यांनी दिली.
तलावातील मृत माशांवर ताव मारण्यासाठी कावळयांनी मोठी गर्दी केली आहे़ विषबाधा झालेल्या पाण्याची तपासणी व चाचणी करण्यासाठी पुण्याहून पथक मंगळवेढ्यात दाखल झाले आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत पाणी व मृत मासे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.