सोलापूर : जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कलर झेरॉक्सच्या साह्याने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºया दोन सख्ख्या भावांना शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्याकडून दहा ते बारा बनावट प्रमाणपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. शुभम विजयकुमार एकबोटे, राहुल विजयकुमार एकबोटे (रा़ दोघे गुरुनानक चौक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांना गुरुनानक चौक येथील शुभम ई-सेवा केंद्रात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जातात, याची गुप्त माहिती मिळाली.़ त्या माहितीच्या आधारे त्यांनी बनावट ग्राहक पाठवून या माहितीची खात्री करून घेतली़ त्यांनी उमेजा क्लिनिक हॉस्पिटलमधील डॉ. अफ्रीन अय्युब कलबुर्गी यांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची कलर प्रिंट काढून त्याची छेडछाड केली. प्रवास करणाºया प्रवाशांना कोरोना नसल्याचे बनावट प्रमाणपत्र दिले़ शुभम ई-सेवा केंद्रावर पोलिसांनी गुरुवारी छापा मारला आणि त्यांच्या ताब्यातील दहा ते बारा कोरे वैद्यकीय प्रमाणपत्र जप्त केले़ याबाबत डॉ़ अफ्रीन अय्युब कलबुर्गी (वय ३०, रा़ पुरंंदर अपार्टमेंट, व्यंकटेश नगर) यांनी वरील दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिली़ त्यानुसार आरोपींच्या नावे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्तबापू बांगर, सहायक आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही़ बी़ बायस, पो.ना. संतोषा येळे, सचिन गायकवाड, मंगरुळे, अर्जुन गायकवाड, वसीम शेख, इब्राहिम शेख, प्रवीण शेळकंदे, दीपक जाधव, अमोल कानडे, पूजा कोळेकर यांनी केली आहे.
एका वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी शंभर रुपयेवरील दोन्ही आरोपींनी डॉ़ कलबुर्गी यांनी दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये छेडछाड करून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले आणि गरजू प्रवाशांना प्रत्येकी पन्नास ते शंभर रुपयांना विकले़ हे काम गेल्या महिन्यापासून सुरू होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे़ अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली़