सोलापूर : ट्युशनसाठी म्हणून घरातून गेलेल्या तरुणीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. मल्लिकार्जुन नगर येथील हा प्रकार असून तिच्या आईने नातेवाईकांनीच घातपात केला असा आरोप केला आहे.
सुनिता लक्ष्मण कुसेकर (वय १८) असे संशयास्पदरीत्या मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. सुनिता कुसेकर ही एसबीसीएस शाळेत मधील जुनियर कॉलेजला ११ वी मध्ये शिकत होती. सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ती कन्ना चौक येथे ट्युशनला जाण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडली. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सुनिता कुसेकर हिच्या मैत्रिणीचा आई कांचन लक्ष्मण कुसेकर यांना फोन आला. फोनवर तुमची मुलगी सुनिता कुसेकर ही चक्कर येऊन पडल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे सांगितले.
आई कांचन कुसेकर यांनी रुग्णालयात धाव घेतली असता तेथे डॉक्टरांनी मुलीच्या आधार कार्डची मागणी केली. आईला संशय आल्यानंतर त्यांनी विचारणा केली असता डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. आईने मुलीला इथे कोण सोडून गेले, असे विचारले असता त्यांनी गायकवाड नावाच्या तुमच्या नातेवाईकांनी सोडून गेल्याचे सांगितले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच पुढील कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
१२ वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला होता
0 मयत सुनिता कुसेकर ही अवघ्या सहा वर्षाची असताना तिचे वडील लक्ष्मण कुसेकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर कांचन कुसेकर यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी करत दोन मुलींना वाढवले. कांचन कुसेकर यांना आणखी एक मोठी मुलगी आहे ती ही शिक्षण घेते. बिकट परिस्थितीचा सामना करत मुलींना शिक्षण देत असताना अचानक घडलेल्या प्रकारामुळे मल्लिकार्जुन नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
( फोटो रेवन आप्पा यांच्या व्हाट्सअप वर मेल वर पाठवला आहे)