कुर्डूवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी सकाळी काही व्यापा-यांनी दुकाने उघडली. पोलिसांची गाडी येताच दुकानांचे शटर बंद झाले. लॉकडाऊनला विरोध करीत व्यापा-यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली.
कुर्डूवाडीत दुकाने उघडी असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे स्वत: बाजारपेठेत दाखल झाले. पोलीस गाडीवरील स्पीकरवरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. कारवाई टाळण्यासाठी व्यापा-यांनी दुकाने बंद करुन बैठक घेतली. त्यानंतर व्यापा-यांनी संजयमामा शिंदे यांची भेट घेतली. दोन लसी झालेल्या व्यापा-यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, कुर्डूवाडी शहरात कोरोना रुग्ण सध्या नगण्य आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमधून सूट देण्यात देण्याची मागणी व्यापा-यांनी केली.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, हरिभाऊ बागल, दिलीप सोनवर, चंद्रकांत वाघमारे यांनीही व्यापा-यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. यावेळी फुलचंद धोका, विकास संचेती, राजू पुरवत, भरतेश समर्थ, अभिजित धोका, सौरभ जवंजाळ ,निखिल धोका, निलेश संचेती आदी उपस्थित होते.
..........
दोन लस घेतलेल्या व्यापारी वर्गास दुकाने उघडी ठेवण्याच्या परवानगीचा निर्णय झाला आहे. येत्या दोन दिवसांत पालकमंत्र्यांशी चर्चा करुन कुर्डूवाडी शहरातील दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
- संजयमामा शिंदे
आमदार
.......................
फोटो १३ कुर्डूवाडी २
संचारबंदी हटवा, अशी मागणी आ. संजयमामा शिंदे यांच्याकडे करताना व्यापारी
130821\img-20210813-wa0276.jpg
लॉकडाऊन बाबत बातमी फोटो