महेश कुलकर्णी : आॅनलाइन लोकमतसोलापूर: महामार्गावरील आणि त्यापासून पाचशे मीटर अंतरावरून मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील या ठिकाणची दुकाने आता शाळा आणि भरलोकवस्तींमध्ये थाटली गेली आहेत. या दुकानांना परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध व्यक्त होत असून येथील रहिवासी संघटनांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय महामार्गावर एकूण ८९५ दारु दुकाने, बीअर बार व परमिट रुम आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यातील ५६८ दुकाने बंद पडली. सद्यस्थितीत ३२७ मद्यविक्रीची दुकाने चालू आहेत. यातील ८९ दुकानांना पर्यायी जागा मिळाल्याने त्या दुकानांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात शहरातील लकी, लक्ष्मी, एकता, जानी, पुष्कराज, लाल ही दुकाने पूर्वीच्या जागेवरून नवीन जागेत शिफ्ट झालेली आहेत. शाळा, मंदिर, मस्जिद, हॉस्पिटलच्या ठिकाणापासून ठराविक अंतरावर परमिट रुम किंवा वाईन शॉप नसावे असा नियम आहे. त्याची शहानिशा करण्याचे काम उत्पादन शुल्क खात्यातील कर्मचाऱ्यांचे असते. नियमानुसार ७५ मीटर अंतर असावे. तांत्रिकदृष्ट्या हे अंतर नियमानुसार मोजलेले असले तरी ते कोणत्या बाजूने कोठून कसे मोजले हे महत्त्वाचे आहे; पण शाळा आणि रहिवासी भागातच ही दुकाने थाटली गेल्यामुळे नियमानुसार अंतर मोजण्यात विद्यार्थी किंवा रहिवाशांच्या हिताचा विचार करण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले. भवानी पेठेतील लकी आणि पुष्कराज वाईन्स या दुकानाच्या परिसरात १०० फुटांवर वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल, दयानंद काशिनाथ आसावा, एसव्हीसीएस या शाळा आहेत. त्याचबरोबर पाठीमागे अबुबकर सिद्दीकी मदरसा व मस्जिद आहे. त्यालगत एक हनुमान आणि दुर्गामातेचे मंदिर आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थी, मंदिर-मशिदीत येणाऱ्या भाविकांना या दुकानांसमोरून जावे लागत आहे. या परिसरातील ३० पेक्षा अधिक नागरिकांनी या दुकानांना त्वरित हटविण्यासाठी स्वाक्षरीसह निवेदन तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.----------------काय आहे नियमपरमिट रुम आणि बीअर बारसाठी धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, एस.टी. स्थानक, रेल्वे स्थानक, आगार यापासून ७५ मी. अंतर असावे, असा नियम आहे. देशी दारू दुकान आणि वाईन शॉपचे नवीन परवाने १९७३ पासून शासनाने दिलेले नाहीत. यामुळे बीअर बार आणि परमिट रुमचेच निकष या स्थलांतरित वाईन शॉपला लावण्यात आलेले आहेत.--------------कुठे कोणते दुकाऩ़़़़- लक्ष्मी वाईन शॉप - एलएफसी शाळेजवळ- गुलमोहर वाईन शॉप - पूर्वी कोणार्कनगरमध्ये स्थलांतरित केले. स्थानिकांच्या विरोधामुळे आता केएलई शाळेजवळ- लकी वाईन शॉप - आसावा, एसव्हीसीएस शाळेजवळ- पुष्कराज वाईन शॉप - चन्नवीर शिवाचार्य प्रशालेजवळ- जानी अॅण्ड सन्स - इंदिरा कन्या प्रशालेजवळ- लाल वाईन शॉप - महापालिका कॅम्प शाळेजवळ--------------नागरी वस्तीत स्थलांतरित झालेल्या मद्य विक्रीच्या दुकानांबाबत पोलीस आयुक्तालयास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही नियमबाह्य आढळल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. - सूर्यकांत पाटीलपोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा---------------------आमच्या शाळेपासून २०० मीटरच्या आत दोन मद्यविक्रीची दुकाने सुरू
सोलापूरातील मद्याची दुकाने शाळा, लोकवस्तीजवळ ‘शिफ्ट’, विद्यार्थी -नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:35 PM