सोलापूर: सोलापूर शहर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा प्रतिबंध कसा करावा ? संचारबंदी लागू करणे योग्य आहे का? याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे अधिकारी व राजकीय पक्षांच्या मंडळीकडून मते जाणून घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी सकाळी सोलापूरच्या दौºयावर आले आहेत. शासकीय विश्रामधाम येथे सकाळी अकरा वाजल्यापासून ते विविध पक्षाच्या पदाधिकाºयांशी भेटले व त्यानंतर अधिकाºयांची बैठक घेत आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रतिबंध कसा करावा याबाबत विविध विभागाच्या अधिकाºयांची मते जाणून घेत आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित आहेत.
त्यानंतर जिल्हा नियोजनच्या सभागृहात बँक अधिकाºयांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ते शहरातील कोरोना प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना करणार याची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकमंत्री भरणे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. संचारबंदीसाठी अनेकांनी नकार दर्शविल्याचेही सांगण्यात आले आहे़