शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
3
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
4
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
5
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
6
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
7
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
8
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
9
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
10
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
11
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
12
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
13
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
14
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
15
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
16
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
17
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
18
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
19
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
20
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच

कोर्टाचा अवमान केला म्हणून रेल्वेचे डीआरएम यांना कारणे दाखवा नोटीस

By विलास जळकोटकर | Published: January 06, 2024 5:23 PM

२४ जानेवारीला सुनावणी : कर्मचाऱ्याच्या पगारीतील रक्कम पत्नीला दिली नाही

सोलापूर : रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगारीतील रक्कम कपात करुन त्याच्या पत्नीला पोटगीपोटी न दिल्याप्रकरणी न्यायालयाचा अवमान झाला म्हणून कोर्टाने सोलापूर विभागाचे प्रमुख डीआरम यांना कारणे दाखवा नोटीस काढली. सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. पाटील यांनी ही नोटीस काढण्याचे आदेश बजावले आहेत. या प्रकरणाची सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, शहरातील मुर्गीनाला पिंडारी मज्जिद येथील झीनत आसिफ शेख हिचा विवाह रेल्वे कर्मचारी आसिफ अलीसाब शेख (रा. दाळ गल्ली, उत्तर सदर बाजार सोलापूर) याच्याशी झाले होते. कालांतराने त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर पतीसह सासरच्या लोकांनी संगनमत करून शारीरिक व मानसिक त्रास होऊ लागला. यातून कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी पीडित पत्नी झीनत आसिफ शेख यांनी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम १२ अन्वये ॲड. रियाज शेख यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती.

दरमहा ९ हजार पोटगीचा होता आदेशया अर्जात पत्नीने न्यायालयामध्ये दर महिना उपजीविकेसाठी, पोटगी व घर भाड्याची मागणी केली होती. न्यायालयाने पत्नीची मागणी व गरजेचा विचार करून दरमहा ९ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिला होता. हा आदेश होऊनही पती आसिफ हा कोर्टामध्ये पोटगीची रक्कम भरत नसल्याने अर्जदाराने वकिलामार्फत न्यायालयामध्ये अर्ज सादर करून पती आसिफ शेख यांच्या पगारीतून रक्कम कपात करून मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता.सदर अर्ज देखील न्यायालयाने मंजूर करून सोलापूर रेल्वे विभाग प्रमुखांना लेखी पत्रा अन्वये दर महिना ९ हजार रुपये आसिफ शेख याच्या पगारीतून कपात करून अर्जदार झीनत शेख यांना देण्याचा आदेश बजावला होता.

दोन महिनेच मिळाली रक्कमया आदेशाप्रमाणे केवळ २ महिनेच पत्नीला पगारातून कपातून रक्कम मिळाली परंतु डिसेंबर महिन्यामध्ये कोणतीही रक्कम मिळाली नाही. डीआरएम ऑफिस मध्ये जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता अर्जदारास उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

पुन्हा न्यायालयात धावरक्कम मिळणार नसल्याचे सांगितल्यानंतर अर्जदाराने वकिलामार्फत पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष अर्ज सादर करून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अर्जदारास रक्कम देण्यामध्ये संबंधीत कार्यालयाने कसुरी केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे नमूद केले. सोलापूर विभागाचे रेल्वे प्रमुख डी आर एम यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची मागणी अर्जदाराच्या वतीने ॲड. रियाज शेख यांनी युक्तीवादात केली.

नोटिसीचा आदेशहा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. पी. पाटील यांनी सोलापूर रेल्वे विभाग प्रमुख डी आर एम सेंट्रल रेल्वे सोलापूर डिव्हिजन यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश पारित केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जानेवारी २०२४ रोजी आहे. अर्जदारातर्फे ॲड. रियाज शेख काम पाहत आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर