अक्कलकोट : सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासाठी सोलापूरला काढल्या जाणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन मराठा समाजाने आपली ताकद दाखवावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
सकल मराठा समाजाच्यावतीने सोलापूर येथे रविवारी ४ जुलैला आक्रोश मार्चा निघत आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी गुरुवारी सर्जेराव जाधव सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले.
या बैठकीस आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सोपानराव गोंडाळ, प्रा. भीमराव साठे, प्रकाश पडवळकर, अतुल कोकाटे, बाळा शिंदे, राम जाधव, बालाजी पाटील, आतिष पवार, महेश हिंडोळे, शिवशरण जोजन, मोतीराम राठोड, बाबासाहेब निंबाळकर, अरुण जाधव, बाळासाहेब मोरे, यशवंत धोंगडे, सुभाष गडसिंग, तम्मा शेळके, किरण पवार, प्रवीण घाटगे, प्रा. प्रकाश सुरवसे, मनोज निकम, गोविंद शिंदे, संजय गोंडाळ, रवी कदम, गोवर्धन जाधव, सुरेश कदम, मनोज इंगुले, योगेश पवार, ऋषिकेश लोणारी, माणिक बिराजदार, प्रदीप जगताप, प्रशांत भगरे उपस्थित होते.
आ. कल्याणशेट्टी म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणाची केलेली मागणी ही रास्तच आहे. आरक्षण मिळावे यासाठी आमदार म्हणून पाठिंबा राहील. मोहनराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर मराठा सेवा संघाचे अतुल जाधव यांनी सूत्रसंचालन केले.