आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्यासाठी बुधवारी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दीर्घकालीन पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी अमृत योजनेतून जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड बदलणे, केगाव ते जुना पुणे नाका जलवाहिनी बदलणे आणि उजनी जलवाहिनीवरील सर्व व्हॉल्व्ह बदलण्याचे काम मंजूर झाले आहे. जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्याचे काम बुधवार, दि. २५ आॅक्टोबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या दिवशी उजनी जलवाहिनीवर ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजता उजनीवरील पंप बंद करण्यात येतील. त्यानंतर जलवाहिनी रिकामी करून जागोजागी गळती असलेले सर्व व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. दोन दिवसात हे काम पूर्ण करून पंप सुरू करण्यात येणार आहेत. या कामामुळे उजनी जलवाहिनी दोन दिवस बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत. बुधवारी उजनी जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या अवंतीनगर, उत्तर कसबा, साठे चाळ, मोटे वस्ती, काळी मशीद परिसर, इंदिरानगर, ईरण्णा वस्ती, भूषणनगर भाग: ३, राजीवनगर, रामलिंग सोसायटी, कोळी समाज सोसायटी, गरिबी हटाव झोपडपट्टी नं. २, आदित्यनगर, निर्मिती विहार, समतानगर, विजय देशमुखनगर, यतिमखाना या भागात पाणीपुरवठा होणार नाही. व्हॉल्व्ह जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर गुरुवारी रात्री उशिरा पंप सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने या भागाला पाणीपुरवठा करण्यात येईल. जलवाहिनी दोन दिवस बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे शहर व हद्दवाढ भागात बुधवारपासून आठवडाभर चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. ------------------२५ एअर व्हॉल्व्ह बदलणारया मोहिमेत जलवाहिनीवरील २५ एअर व्हॉल्व्ह, पंपहाऊसजवळील ओपन एक्सपाईन्सेन्स जॉर्इंट बदल्यात येणार आहेत. गुरुवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असून ठेकेदाराची पाच पथके कामासाठी तयार असल्याची माहिती मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली.
उजनीवर शटडाऊन ! सोलापूर शहराला आजपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:49 PM
सोलापूर दि २४ : अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्यासाठी बुधवारी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देजनी जलवाहिनीवरील सर्व व्हॉल्व्ह बदलण्याचे काम आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा ठेकेदाराची पाच पथके कामासाठी तयार