सोलापूर: सिद्धेश्वर देवस्थानमध्ये विविध विभागात कार्यरत असलेल्या १०५ कर्मचाºयांना आता भाविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तीवेतन लागू होणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून, याचा लाभ २०१५ पासून देण्यात येणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कार्यरत असलेले प्रवर्तन अधिकारी भानुप्रकाश यांनी सिद्धेश्वर देवस्थानची तपासणी केली असता सप्टेंबर २०१८ च्या पगारपत्रकानुसार तेथील १३ विविध विभागात काम करणाºया १०५ कर्मचाºयांना प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन (भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन) चा लाभ मिळत नसल्याचे समोर आले. ही बाब लक्षात आल्यानंतर कार्यालयाकडून याची दखल घेऊन त्यावर प्रक्रिया सुरु केली आहे.
सिद्धेश्वर देवस्थानमध्ये सध्या कार्यालयात लिपिक, शिपाई आणि कारकून असे ८ कर्मचारी आहेत. साहित्य भांडारमध्ये २ लिपिक, ८ वॉचमन, प्रसाद विभागात लिपिक, मदतनीस, आचारी असे ६ जण, यात्री निवासामध्ये लिपिक, मदतनीस, सफाई कर्मचारी असे ४ जण, धार्मिक कार्य खात्यामध्ये २० जण आहेत. यात शास्त्री, सेवाधारी, सनई, चौघडा वादक, लिपिकांचा समावेश आहे. दासोह विभागात स्वयंपाकी, प्रसाद वाटप, मदतनीस, लिपिक असे २२ जण आहेत. साफसफाईसाठी १२ जण, विद्यार्थी वसतिगृहात कारकून, वॉचमन, वाहनचालक, मदतनीस, लिपिक असे ११ जण, रुद्रभूमी व शेतकी विभागात कारकून, मदतनीस, वाहनचालक, वॉचमन, सफाई कर्मचारी असे सहाजण कार्यरत आहेत. मुलींच्या वसतिगृहात अधीक्षिका व सफाई कर्मचारे असे दोघे आहेत. सिद्धेश्वर तलाव देखरेखीसाठी ५ जण आणि न्यायालय विभागासाठी एकजण अशा कर्मचाºयांचा समावेश आहे.
तीन वर्षांपासूनचा लाभ मिळणारच्आतापर्यंत सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या फक्त शैक्षणिक संस्थामध्ये काम करणाºया सिद्धेश्वर प्री प्रायमरी, प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, बाल मंदिर, वूमेन्स पॉलिटेक्निक आदी संस्थांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांचा भविष्य निर्वाह निधी भरला जात होता. आता देवस्थान ट्रस्टच्या सर्व विभागातील सर्व कर्मचाºयांना भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शनचा लाभ सन २०१५ पासून देण्यात येणार असल्याचे तिरपुडे यांनी सांगितले. संबंधित कायदा लागू करण्यास विलंब केल्यामुळे दंड आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टला पीएफ लागू होता. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून २०१५ पासून कर्मचाºयांना तो पुन्हा लागू करण्यासाठीची नोटीस दिलेली आहे. यातील कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल.- धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट