लोकमत न्यूज नेटवर्क
साेलापूर : कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात २०२०-२१ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या दोन लाख १व्या साखर पोत्याचे पूजन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते झाले.
कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती होती. चालू गळीत हंगामात ११ डिसेंबरअखेर दोन लाख ३१ हजार ९३७ मे. टन उसाचे गाळप होऊन दोन लाख तीन हजार ८५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.७१ टक्के इतका मिळाला आहे. या हंगामात कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पातून दोन कोटी ३९ लाख ८६ हजार १५१ युनिट विजेचे उत्पादन केले आहे. त्यामधून एक कोटी ७१ लाख दोन हजार ४०० युनिट वीज निर्यात केली आहे.
या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. दीपक आलुरे, संचालक सिद्धाराम चाकोते, गुरुराज माळगे, सुधीर थोबडे, काशीनाथ कोळी, रमेश बावी, बाळासाहेब बिराजदार, अमर पाटील, कार्यकारी संचालक समीर सलगर, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य शिवकुमार पाटील, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. आर.एस. पाटील, आप्पासाहेब कळके, कारखान्याचे सभासद रतन रिक्के यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
......
फोटो : १२ सिद्धेश्वर साखर कारखाना
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात दोन लाख एकव्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, भीमाशंकर पटणे, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. दीपक आलुरे, सिद्धाराम चाकोते, गुरुराज माळगे, सुधीर थोबडे, समीर सलगर.