सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडकामाचा मक्तेदार सोमवारीही निश्चित झाला नव्हता. दोन दोन दिवसांत दोन मक्तेदार निश्चित होईल, असे नगररचना कार्यालयातून सांगण्यात आले.
चिमणी पाडकामासाठी बिनियास प्रा. लि. मल्लिकार्जुन वस्त्रद, रेहान ट्रेडर्स, शालिमार कस्ट्रक्शन अँड ट्रॅव्हल्स या कंपन्यांनी निविदा दाखल केली होती. यातील बिनियास प्रा. लि. या कंपनी तांत्रिक निकषांमध्ये पात्र ठरली आहे. यानंतर वस्त्रद यांनीही तांत्रिक निकषात पात्र ठरत असल्याचा दावा करणारे पत्र नगररचना कार्यालयाला दिले आहे. या दोन कंपन्यांच्या तांत्रिक पात्रतेचा अहवाल मुख्य लेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. लेखापाल कार्यालयाकडून अहवाल आयुक्तांकडे सादर झाला आहे. मंगळवारी किंवा बुधवारी कंत्राटदार निश्चित होईल, असे नगररचना कार्यालयातून सांगण्यात आले.