पंढरपूर : सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे़ शिवाय या जिल्ह्यातील भाटघर, देवधर व वीर ही धरणे १०० टक्के भरली आहेत़ त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीतपाणी सोडण्यास सुरुवात केली़ ते पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने नदीपात्रा वाढ झाली आहे़ परिणामी चंद्रभागा वाळवंटातील भीमाशंकर मंदिर, भक्त पुंडलिक मंदिरासह अन्य मंदिर व समाधी यांना वेढा दिला आहे़
बुधवारी पुत्रदा एकादशी असल्याने भाविकांनी चंद्रभागा वाळवंटात पवित्र स्नानासाठी गर्दी केली आहे़ स्नान केल्यानंतर भाविक गुडघाभर पाण्यातून जाऊन भक्त पुंडलिकाचे दर्शन घेताना दिसून आले़ सध्या श्रावणमास सुरू असून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे़ हे भाविक प्रथम चंद्रभागेचे पवित्र स्नान करूनच पांडुरंगाचे दर्शन घेतात़ तत्पूर्वी भाविकांना भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी पाण्यातूनच जावे लागत होते़ भक्त पुंडलिक मंदिर परिसरासमोरील भीमाशंकर मंदिरासह अन्य मंदिरे व समाधी यांना पाण्याने वेढा टाकला आहे़ नदीकाठच्या शेतकºयांना फायदासोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी या पाण्याचा लाभ होणार आहे़ पावसाअभावी आणि नदी पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांतील ऊस लागवडी व कांदा लागवड रखडली होती़ मात्र भीमा नदीत पाणी आल्याचे कळताच आता ऊस, कांदा लागवडींना वेग येणार आहे़ शिवाय चालू वर्षी कारखान्याला जाणाºया उसालाही याचा फायदा होणार आहे़